• Thu. Jun 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

बुधवारी शहरात विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ByMirror

Oct 9, 2023

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, सेवाप्रीत व लिओ क्लबचा उपक्रम

गरजूंना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, सेवाप्रीत व लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) रामचंद्र खुंट येथील डॉक्टर सिमरन वधवाज केअर ॲण्ड क्युअर सेंटर येथे होणाऱ्या या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष धनंजय भंडारे, आंचल कंत्रोड, जागृती ओबेरॉय, सचिव दिलीप कुलकर्णी, गीता माळवदे, धारवी पटेल, खजिनदार नितीन मुनोत, अर्चना खंडेलवाल, अरमान खंडेलवाल यांनी केले आहे.


सकाळी 10 वाजता या शिबिराला प्रारंभ होणार असून, यामध्ये थायरॉईड, रक्तातील साखर तपासणी, कॅल्शियम, हिमोग्लोबिन तपासणी, दातांचे विकार व उपचार, नसांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, हात-पायांना मुंग्या येणे, तळपायांची आग, कान, नाक, घसा विकार व उपचार या सर्व तपासण्या अल्प दरात केल्या जाणार आहेत.

शिबिरात डॉ. मानसी आसनानी, डॉ. सिमरनकौर वधवा, डॉ. राजीव चीटकोपीकर, डॉ. कल्पना गायकवाड, डॉ. सारिका दरेकर, डॉ. रेखा पानपाटील आदी तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख विजय कुलकर्णी, रुचिता कुमार, अंजू कथुरिया आहेत. शिबिराच्या अधिक माहिती व नोंदणीसाठी 9075589607 व 9766304928 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *