• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

छावणी परिषदेच्या वतीने हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्वच्छता दूत पुरस्काराने गौरव

ByMirror

Oct 2, 2023

मुख्यकार्यकारी अधिकारी मोरे यांच्याकडून हरदिनच्या सामाजिक कार्याचे कौतुक

अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर सातत्याने स्वच्छता मोहिम राबविणाऱ्या व स्वच्छता पंधरवड्यात सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल अहमदनगर छावणी परिषदेच्या वतीने हरदिन मॉर्निंग ग्रुपला स्वच्छता दूत पुरस्काराने गौरविण्यात आले.


महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर छावणी परिषदने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबविलेल्या स्वच्छता पंधरवाड्याचा समारोप सोमवारी (दि.2 ऑक्टोबर) महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी झाला. भिंगार छावणी परिषदेत झालेल्या या कार्यक्रमात हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांचा छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच ग्रुपच्या सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी छावणी परिषदेचे सदस्य वसंत राठोड, स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उध्दव शिंदे, स्वच्छता निरीक्षक रमेश साके, गणेश भोर, इंजि. महेंद्र सोनवणे, अशोक फुलसौंदर, संजय शिंदे, राजेंद्र भोसले, अरविंद कुडिया, पारनाईक मॅडम, पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जोसेफ पाटोळे, शोभा पाटोळे, रमेश वराडे, दिलीप ठोकळ, दिपकराव बडदे, उमेश केदारे, सर्वेश सपकाळ, अविनाश पोतदार, अशोक पराते, अभिजीत सपकाळ, तुषार घाडगे, कैलास बिडवे, मुरलीधर बरबडे आदी उपस्थित होते.


हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ राबविण्यात येते आहे. छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. ग्रुपच्या सदस्यांचा वाढदिवस, सण-उत्सव, महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी देखील वृक्षरोपण व स्वच्छता अभियानाने साजरी केली जाते. ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेला गती देण्यात आली आहे. हरदिनच्या वतीने सातत्याने सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात आला असून, नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. स्वच्छता हीच सेवा या भावनेने ग्रुपचे सुरु असलेल्या कार्याबद्दल त्यांना स्वच्छता दूत पुरस्काराने गौरविण्यात आले.


छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सार्वजनिक स्वच्छतेसाठी सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना संजय सपकाळ यांनी स्वच्छता ही आरोग्याशी जुडलेला महत्त्वाचा घटक असून, ग्रुपच्या वतीने आरोग्य चळवळीबरोबर स्वच्छतेला महत्त्व देऊन कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *