• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

गणेशोत्सव विसर्जन मार्गावरील क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक रस्त्याचे काम मार्गी

ByMirror

Sep 2, 2023

नगरसेविका अश्‍विनी जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील रस्त्यांचे पॅचिंग व क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक दरम्यान रस्त्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. गणेशोत्सव विसर्जन मार्गावरील सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे व पॅचिंग करण्याची मागणी नगरसेविका अश्‍विनी सचिन जाधव यांनी महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याने सदर रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे.


प्रभाग क्रमांक 10 मधील गणपती विसर्जन मार्ग येत असल्याने परिसरात रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली होती. तर गणेशोत्सवात या परिसरात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. खड्डेमय रस्त्यांमुळे गणेशोत्सवात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होवू नये. तर क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक दरम्यान खडी पसरलेल्या रस्त्यावर चालतांना नागरिकांना इजा पोहचत असल्याने नगरसेविका अश्‍विनी जाधव यांनी रस्त्याचे पॅचिंग करण्याची व क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. सदर रस्त्याचे काम सुरु झाल्याने नागरिकांच्या वतीने जाधव यांचे आभार मानण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *