• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील गटई कामगारांच्या स्टॉलवर गटई आघाडी फलकाचे अनावरण

ByMirror

Aug 17, 2023

चर्मकार विकास संघाच्या वतीने गटई कामगारांना आरोग्य किटचे वाटप

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन गटई कामगारांनी आपला व्यवसाय वाढवावा -आ.संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने शहरातील गटई कामगारांच्या स्टॉलवर गटई आघाडी फलकाचे अनावरण करुन आरोग्य किटचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, जालिंदर बोरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


वाडिया पार्क येथील अर्जुन कांबळे व संतोष कदम यांच्या गटई स्टॉल फलकाचे अनावरण झाले. चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून कष्टकरी गटई कामगार यांच्या सर्वांगीन विकासाकरिता विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच भाग म्हणून गटई आघाडीच्या फलकाचे अनावरण करुन, गटई कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.
संजय खामकर म्हणाले की, चर्मकार विकास संघ कष्टकरी गटई कामगारांच्या व कुटुंबाच्या विकासाला प्रथम प्राधान्य देऊन त्यांचे विविध प्रश्‍न व अडचणी सोडवण्याचे कार्य करीत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून गटई कामगारांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु आहे. कष्टकरी गटई बांधवांना संरक्षण व न्याय देण्यासाठी चर्मकार विकास संघ कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन गटई कामगारांनी आपला व्यवसाय वाढवावा. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, चर्मोद्योग महामंडळ व महानगरपालिका यांच्या माध्यमातून पीच परवाने व गटई स्टॉल देऊन कष्टकरी गटई काम करणाऱ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी चर्मकार विकास संघाचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


कष्टकरी गटई कामगारांना अपघात विमा, आरोग्य विमा, घरकुल योजना, पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. कष्टकरी गटई बांधवांच्या मुलांनी चांगले शिक्षण मिळावे व समाजाचा विकास व्हावा या उद्देशाने देखील चर्मकार विकास संघाचे प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी माहिती दिली. यावेळी भाऊसाहेब आंबेडकर, मनीष कांबळे, गणेश नवरे, आकाश गायकवाड, आघाडीचे शहराध्यक्ष संतोष कांबळे, सचिव दिलीप कांबळे, युवा अध्यक्ष रुपेश लोखंडे, सहविष्णू भागचंद काजळकर, महेश काजळकर, गजानन बागडे, किसन बागडे, भानुदास ननवरे, शंकर शेवाळे, किसन पाचारणे, गोपीनाथ म्हस्के, अंबादास गांगर्डे, दिलीप तावरे, भगवान काजळकर, अंकुश केदारे, दिलीप बोडके, संतोष कांबळे, अक्षय लोखंडे, अर्जुन कांबळे, संतोष कदम, बाळू केदार, भिकाजी वाघ, रुपेश लोखंडे, रामलाल बडोदे, दिनेश ननवरे, संजय शिंदे, नवनाथ पोटे, सोमनाथ भगुरे, गणेश लव्हाळे, लोकेंद्र साखला, दिलीप पीडीयार, विकास धस आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *