• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

7 व 8 डिसेंबरला दिल्लीला ईपीएस 95 पेन्शनर्सचे देशव्यापी आंदोलन

ByMirror

Dec 2, 2022

अहमदनगर जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शनर्स मोठ्या संख्येने होणार सहभागी

अहमदनगर (प्रतिनिधी)- किमान 9 हजार पेन्शन व इतर मागण्यांसाठी देशातील ईपीएस 95 पेन्शन धारकांनी दिल्लीला 7 व 8 डिसेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शनर्स देखील या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या तयारीत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ईपीएस 95 पेन्शनर संघटना अहमदनगरचे अध्यक्ष एस.एल. दहिफळे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, उपाध्यक्ष बाबूराव दळवी यांनी दिली.

या आंदोलनात देशभरातील एक लाखपेक्षा अधिक ईपीएस 95 पेन्शनर्स सहभागी होणार असून, त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी नगर जिल्ह्यातून पूर्ण तयारी करण्यात आली असून, लवकरच आंदोलक रेल्वेने दिल्लीला रवाना होणार आहेत. 7 डिसेंबरला रामलीला मैदान व 8 डिसेंबरला जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

पेन्शन वाढ नाही, तर भाजपला वोट नाही!

ईपीएस 95 पेन्शनर्स असलेले ज्येष्ठ नागरिक या निर्णायक आंदोलनासाठी ऐन थंडीत दिल्लीमध्ये दोन दिवस धरना देणार आहे. देशभरात ईपीएस 95 पेन्शनर्स व त्यांचे कुटुंबीय असे तब्बल 30 कोटी नागरिक आहेत. केंद्र सरकारने त्यांची प्रमुख मागणी पेन्शन वाढ मान्य न केल्यास आगामी निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ईपीएस 95 पेन्शनर्सला किमान 9 हजार पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, ज्येष्ठ पेन्शनर व त्याच्या पत्नीस आरोग्य सेवा मोफत द्यावी, त्यांच्यासाठी बिनशर्त अन्न सुरक्षा कायदा लागू करावा, कोशियारी समितीच्या शिफारसी लागू करण्याच्या मागण्या आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *