• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

सासू-सुनांच्या जोड्यांनी एकत्रित येत लुटला हळदी कुंकू कार्यक्रमाचा आनंद

ByMirror

Jan 29, 2023

जय दुर्गा माता महिला मंडळाच्या वतीने कुटुंबातील स्नेह व ऋणानुबंध जोडण्याचा उपक्रम

ज्येष्ठ महिला कुटुंबाचा कणा -सुरेखा भोसले

अहमदनगर (प्रतिनिधी)- तिळातील स्नेह व नात्यातील गोडवा जपत सासू व सुनांनी एकत्रित येत हळदी कुंकूचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. शहराच्या भोसले आखाडा येथील जय दुर्गा माता महिला मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या या आगळ्या-वेगळ्या हळदी कुंकू कार्यक्रमात सासू-सुनांची जोडी एकत्रित आल्या होत्या.


या कार्यक्रमातून कुटुंबातील स्नेह व ऋणानुबंध जोडण्याचे काम करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा कैलास भोसले, प्रवीणा घैसास, जया गायकवाड, सीमा दिवान, अलकाताई मुंदडा, मंदाकिनी वाघमारे, अर्चना भंडारे, कुंदा नगरे, योगिता खताळ, मीनल भोसले, वर्षा भोसले, डॉ. अमृता अभिषेक भोसले, कांता भोसले, शोभा भोसले, अश्‍विनी भोसले, मनिषा भळगट, मिरा धामणे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


मैत्रीपूर्ण आनंदी सासू व सुन म्हणून अ‍ॅड. प्रणाली चव्हाण व सासू दुर्गावती चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. सुरेखा भोसले म्हणाल्या की, हळदी-कुंकू कार्यक्रमात विचारांचे वाण सर्वश्रेष्ठ आहे. या कार्यक्रमातून सासू-सुनांमधील मैत्रीपुर्ण नाते व ऋणाणुबंधचा संदेश देण्यात आला. ज्येष्ठ महिला कुटुंबाचा कणा असून, ज्या समाजात महिलांना सन्मान आहे, ते आज प्रगतीपथावर आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा अनुभव व मार्गदर्शन जीवनात दीपस्तंभा प्रमाणे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर जय दुर्गा माता महिला मंडळाच्या वतीने विविध सण-उत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *