• Wed. Aug 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशनकडून शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वेडिंग मशीनची भेट

ByMirror

Aug 11, 2026
डिस्पोजल व सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण

शाळेचा माजी विद्यार्थीच ठरला विद्यार्थिनींसाठी ‘ पॅडमॅन,’

डिस्पोजल व सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालय कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशन, कृष्णाली फाऊंडेशन आणि होगानस इंडिया प्रा. लि. यांच्या सीएसआर सहकार्याने स्वास्थ्य सखी महिला स्वच्छता जनजागृती व आरोग्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे 150 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशनचे संचालक प्रशांत पाटील शेळके हे याच शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्याची गरज ओळखून सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन, वापरलेल्या पॅडची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन तसेच सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले. या उपक्रमासाठी माजी विद्यार्थ्याने दाखवलेली सामाजिक बांधिलकीतून तो “विद्यार्थिनींसाठी पॅडमॅन” ठरला. या सुविधेमुळे विद्यार्थिनींना शाळेतच आवश्‍यकतेनुसार सॅनिटरी पॅड सहज उपलब्ध होणार असून वापरलेल्या पॅडची स्वच्छ व वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे.


कार्यक्रमात सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी छायाताई निमसे आणि डॉ. पल्लवी जाधव यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत माहिती दिली. मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील नैसर्गिक जैविक प्रक्रिया असून त्याबाबत असलेले अंधश्रध्दा, गैरसमज आणि लाज-भीती दूर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. योग्य स्वच्छता, संतुलित आहार, नियमित सॅनिटरी पॅडचा वापर आणि आरोग्याची काळजी याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक गोडे सर यांनी सांगितले की, “ आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत पाटील शेळके यांनी आपल्या शाळेतील मुलींसाठी इतका महत्त्वाचा आणि उपयुक्त उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. मुलींच्या आरोग्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाला उद्योजक संजय शिंदे, अकोलकर सर, कृष्णाली फाऊंडेशनचे खजिनदार अमर बोबडे, सदस्य सुनिल शेळके, प्रियांका गायकवाड, आशा शेळके, आशासेविका निमसे, फलके, शेळके यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक गोडे सर, कोरडे मॅडम, बांदल मॅडम, सोनटक्के मॅडम, ढवळे मॅडम, चव्हाण मॅडम, कर्डिले सर, धेंडे सर, मिसाळ सर, राहुल गायकवाड आणि प्रशांत लांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन कृष्णप्रित वेलफेअर फाउंडेशनचे संचालक प्रशांत पाटील शेळके आणि संचालिका प्रियांका पाटील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *