• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

रामवाडीतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ByMirror

Sep 22, 2022

भाजप अनुसूचित जाती मोर्चाचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी, सर्जेपूरा भागातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांना भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा पंधरवडातंर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मंडलाध्यक्ष अशोक भोसले, सचिव सुनिल सकट, बालभवनच्या जयश्री शिदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, संघटक पोपट भोसले आदी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.


मंडलाध्यक्ष अशोक भोसले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने समाजातील शेवटच्या घटकांना आधार मिळत आहे. केंद्राच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबवून त्याचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना मिळत आहे. असंघटित कामगारांना 8 हजार ई श्रम कार्ड काढून देण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिनाभर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून ई श्रम कार्ड काढून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सचिव सुनिल सकट यांनी भाजपने कल्याणकारी राज्याची प्रचिती सर्वसामान्यांना दिली आहे. पंतप्रधान यांच्या प्रेरणेने भाजपचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता समाज भावनेने योगदान देत असून, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांना रजिस्टर, वह्या, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष बबन दिवटे, ज्येष्ठ नागरीक सलिम मिर्जा, सामाजिक कार्यकर्ते सागर साठे, सोमनाथ अडागळे, भास्कर जाधव, मंगेश गायकवाड, प्रकाश साबळे, नामदेव अडागळे, विकास पेटारे, महेश भोसले, नितीन चव्हाण, विक्की पेटारे, ज्ञानेश्‍वर अडागळे, गणेश शिरोळे, संतोष आडागळे, मयुर साबळे यांनी परिश्रम घेतले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *