• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र केसांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ByMirror

Oct 10, 2022

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त टकटी दरवाजा येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) निमित्त सालाबाद प्रमाणे शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र केसांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.


देशात सात ते आठ ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र केस आहे. यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, नागोर, बडीखाटू (राजस्थान), मध्यप्रदेश, काश्मीर आणि तुर्कस्तान देशातील आस्तंबूल या गावाचा समावेश आहे. नगरच्या मोघल कालीन इतिहासात हजरत मोहम्मद पैगंबरांच्या पवित्र केसांचा उल्लेख आलेला आहे. इराक व इराण बॉर्डरवर असलेले मशहद (शहिदांचे गाव) शहरातून हजरत मोहम्मद पैगंबरांचे पवित्र केस आणले असून, परंपरेनुसार फक्त मोहम्मद पैगंबर जयंतीच्या दिवशी हे पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येत असल्याची माहिती पुजारी सय्यद बुर्‍हाण यांनी दिली.

यावेळी मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महलला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, फुलांची सजावट करण्यात आली आहे. दर्शनास येणार्‍या भाविकांना यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *