• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात जागतिक सायकल दिवस साजरा

ByMirror

Jun 3, 2023

सायकल रॅलीतून विद्यार्थ्यांचा आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा जागर

नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक सायकल दिवस निमित्त भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे सायकल रॅली काढण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली.


विद्यार्थ्यांनी आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा जागर करीत गावातून सायकल रॅली काढली होती. यावेळी युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, प्रा. अमोल वाबळे, अभिजीत पाचारणे, मयुर काळे, सचिव प्रतिभा डोंगरे आदींसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, सायकल चालवणे आरोग्यासाठी व प्रदुषणमुक्तीसाठी सर्वोत्तम पर्याय असून, त्याचा अवलंब करण्याची गरज आहे. निरोगी व सदृढ आरोग्यासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. उत्तम आरोग्य पैश्याने विकत मिळत नाही तर मैदानावर प्रत्येकाने उतरले पाहिजे. सदृढ आरोग्य हीच खरी धनसंपदा असून, युवकांमध्ये याविषयी जागृती होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


संदिप डोंगरे म्हणाले की, योगा, धावणे, सायकलिंग, पोहणे यांसह मैदानी खेळासाठी प्रत्येक युवक-युवतींनी दररोज वेळ दिला पाहिजे. व्यायामाने शाररीक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. तसेच योग्य आहार देखील तेवढाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगून, व्यसनापासून लांब राहून शरीर संपदा जपण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *