• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

गृहोद्योजिका मीरा बेरड यांना राजमाता जिजाऊ व आशात्मजा पुरस्काराने सन्मानित

ByMirror

Apr 1, 2023

गृहोद्योगातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याच्या कार्याचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- गृहोद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणार्‍या जिल्ह्यातील आवळा क्विन म्हणून ओळख निर्माण केलेल्या मीरा बाळासाहेब बेरड यांना राजमाता जिजाऊ व आशात्मजा पुरस्काराने गौरविण्यात आले.

मीरा बेरड


विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन, मराठा समन्वय परिषद व हिरकणी ग्रुप यांच्या संयुक्त नगर शहरात तर नैसर्गिक मानवाधिकार फोरम, आत्मजा फाऊंडेशन यांच्या वतीने राहुरी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात बेरड यांच्या कार्याचा मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे व माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.


मीरा बेरड या दरेवाडी येथील अमृत फूड्सच्या संचालिका आहेत. गेल्या पाच वर्षापासून त्यांनी गृहोद्योग उभा करुन अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचे आवळ्याचे विविध उत्पादनांना महाराष्ट्रासह इतर राज्यात मागणी आहे. त्या आपल्या उद्योगाबरोबरच इतर गृहोद्योग चालविणार्‍या महिलांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी तयार केलेला आवळा गुलाबजाम राज्यभर प्रसिध्द आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या विविध उपक्रम घेत असून, महिलांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी त्या सातत्याने योगदान देत आहेत.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राजमाता जिजाऊ व आशात्मजा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या गृहोद्योगाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून, सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *