• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावात संविधान दिन उत्साहात साजरा

ByMirror

Nov 26, 2022

केडगाव ग्रामस्थ व संदिप (दादा) कोतकर मित्र मंडळाच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव ग्रामस्थ व संदिप (दादा) कोतकर मित्र मंडळाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. केडगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक राहुल कांबळे, गणेश ननावरे, सुरज शेळके, भूषण गुंड, संदीप पगारे, कार्तिक नरवडे, सचिन सरोदे, नवनाथ घेबूड, महेश कांबळे, लखन शिंदे, अमोल कांबळे, विशाल कांबळे, मंगेश कांबळे, अभि शिरवाळे, करण पाचारणे आदी उपस्थित होते.


नगरसेवक राहुल कांबळे म्हणाले की, संविधान एका समाजापुरता मर्यादित नसून, सर्व भारतीयांचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने देशात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. संविधानामुळे जगाला भारताच्या प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली असून, संविधानानेच भारताची एकात्मता टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश ननावरे यांनी संविधानाने देशात समता, बंधुता व स्वतंत्र्यता प्रस्थापित झाली आहे. देशाला एकसंघ ठेवण्याचे काम संविधानाने केले. जगातील सर्वात मोठी लोकशाही संविधानाने जिवंत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *