• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

रिपाईच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा

ByMirror

Nov 26, 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन

देशातील विविधतेतील एकता संविधानाने नटली -सुनिल साळवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, शहराध्यक्ष किरण दाभाडे, विजय भांबळ, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, प्रतिक नरवडे, विशाल कदम, पवन भिंगारदिवे, बौध्दाचार्य संजय कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, शितल घोडके, सिध्दांत दाभाडे, वैभव जाधव, संदीप तुपारे, आर.बी. रंधवे, सचिन कांबळे, प्रदीप बोराटे, बापू जावळे, प्रमोद घोडके, योगेश त्रिभूवन आदी उपस्थित होते.


रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे म्हणाले की, देशाला एकसंघ ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. देशातील विविधतेतील एकता संविधानाने नटली असून, लोकशाही संविधानाने जिवंत आहे. देश अखंड, धर्मनिरपेक्ष व एकात्म राहण्यासाठी संविधानाची निर्मिती केली गेली. संविधान हा देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून, देशाचे अखंडत्व संविधानामुळे टिकून असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी मुंबई येथे झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना रिपाईच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *