• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

अरणगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ByMirror

Jan 28, 2023

सीमा सुरक्षा दलाचे जवान योगेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) मध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल. ग्रामपंचायतसह विविध संस्था व शाळांमध्ये ध्वजारोहण करुन सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


भारताच्या सीमा सुरक्षा दलामध्ये असलेले गावातील सुपुत्र योगेश नारायण पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्र ध्वज फडकविण्यात आला. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली अवतार मेहेरबाबा विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी नानेश्‍वर जवळकर, बाळासाहेब भस्मे, सुहास काळभोर, पप्पू पवार, भानुदास शिंदे, बबन शिंदे, पप्पू दळवी, पीनू दळवी, लहू अजबे, महेश पवार, संदीप साखरे, पंढरीनाथ मुदळ, श्रीकांत रोहकले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *