अनाथांच्या उज्वल भवितव्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज -भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमला भेट देऊन आश्रमातील मुलांना आमरस भोजन दिले. यावेळी बालकिर्तनकार कृष्णानंद महाराज समवेत विद्यार्थी उपस्थित होते.
बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे बालकिर्तनकार कृष्णानंद महाराज पंचवीस ते तीस मुलांचा सांभाळ करत आहे. शासनाचा कुठलाही अनुदान नसताना किर्तन प्रवचन सेवेतून ते अनाथ मुलाचे उज्वळ भविष्य घडविण्यांचे कार्य करीत आहेत. शालेय शिक्षण देऊन त्यांचे संगोपन केले जात आहे. वाळकी (ता. नगर) येथील सामार्जिक कार्यकर्ते विजय भालासिंग यांनी नुकतीच आश्रमाला भेट देऊन मुलांबरोबरच रममाण झाले होते. कृष्णानंद महाराज यांनी भालसिंग यांचा आश्रमच्या वतीने सत्कार केला.
विजय भालासिंग म्हणाले की, अनाथ मुले समाजातील एक घटक असून, त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. या आश्रमात आई-वडिल नसलेल्या मुलांचा उत्तम प्रकारे सांभाळ केला जात असून, या वंचित घटकातील मुलांसाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. आश्रमाच्या बांधकाम सुरु असून, त्याला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. आश्रमांचे सचिव ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज आढाव, आश्रम व्यवस्थापिका निकीताताई आढाव, ह.भ.प. प्रकाश महाराज मेहेत्रे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.