भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर सलग नऊ दिवस फुटबॉलचा थरार
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फिरोदिया शिवाजीयन्स व आंबेडकर एफसी संघ विजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष जोगासिंह मिनहाज, शिवाजीयन्सचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, सचिव गॉडविन डिक, सहसचिव रौनक फर्नांडिस, गोपीचंद परदेशी, जावेद शेख, व्हिक्टर जोसेफ, विलास शेलार आदींसह खेळाडू उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना (एडीएफए) चे माजी सचिव अलेक्स फर्नांडिस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर ही फुटबॉल स्पर्धा होत आहे. अॅलेक्स फर्नांडिस हे उत्कृष्ट खेळाडू होते. त्यांनी फुटबॉल खेळाला सर्वस्वी अर्पण करुन, या खेळाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना चालना मिळणार असल्याची भावना उद्घाटनाप्रसंगी नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली. फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष जोगासिंह मिनहाज व शिवाजीयन्सचे अध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी स्पर्धेतील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

उद्घाटनानंतर पहिला सामना फिरोदिया शिवाजीयन्स विरुद्ध जेएफसी यांच्यात झाला. यामध्ये फिरोदिया शिवाजीयन्सने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 5-0 गोलने जेएफसी संघावर एक हाती विजय मिळवला. फिरोदिया शिवाजीयन्स कडून अभय साळवे, मयुर गोरखे, अरमान फकिर यांनी प्रत्येकी एक तर रोहन देठे याने दोन गोल केले.
तर दुसरा सामना आंबेडकर एफसी विरुध्द युनिटी एफसी यांच्यात झाला. यामध्ये आंबेडकर एफसीने संघाने 3-0 ने युनिटी एफसी संघावर विजय मिळवला. आंबेडकर एफसी संघाकडून कृष्णा चव्हाण याने दोन तर कुनाल पारधे याने एक गोल केला. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पल्लवी सैंदाणे, सचिन पात्रे, जेव्हिअर स्वामी, उपेंद्र गोलांडे, रुनक फर्नांडिस आदी परिश्रम घेत
