श्रीगोंदा हंगेवाडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा हंगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील 200 विद्यार्थ्यांना सहकार महर्षी सिताराम गायकर याच्या वाढदिवसानिमित्त इतर सर्व खर्चाला फाटा देत अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी चिराग चोरडीया, गणेश साबळे, नितीन रायकर आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात तसेच अहमदनगर जिल्ह्यात ज्यांची सहकारातून प्रतिमा उंचावली आहे असे अहमदनगर जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व माजी चेअरमन सिताराम गायकर पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे.
गायकर यांनी आपल्या जीवन प्रवासात ऊस तोड कामगार ते साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदापर्यंत आणि जिल्हा बँकेच्या चेअरमन पदापर्यंत संघर्षमय प्रवास केला आहे. यातून त्यांनी जिल्ह्यात आणि तालुक्यात तसेच राज्यात मोठी जिवाभावाची माणस या जीवन प्रवासातून कमवली आहेत. त्यानी फक्त जुने जाणते नाही तर, तरुणाईचा सुध्दा मोठा मित्रपरिवार आहे.
तसेच आज पर्यंत अनेक गरीब, दिनदुबळ्या, होतकरू कुटूंबाना व त्या कुटुंबातील तरुणांना सदैव मदतीचा हात पुढे केला आहे. गायकर यांनी जर एखाद्याला मायेची ऊब दिली तर त्या व्यक्तीला कोणत्याही संकटात हा महामेरू हात दिल्याशिवाय राहत नाही हे तालुक्यातील अनेक व्यक्तींना आलेल्या अनुभव आहे. सहकारमहर्षी सिताराम गायकर पाटील यांच्या वाढदिवसाच्या
निमित्ताने सर्व खर्चला फाटा देत संध्या सोनवणे यांच्या संकल्पनेतून अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रभात चौधरी व जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट यांनी जिल्हाभर नावीन्य उपक्रम राबवित असुन. शालेय मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.