• Wed. Mar 26th, 2025

समता परिषदेच्या नगर तालुकाध्यक्षपदी रामदास फुले यांची नियुक्ती

ByMirror

Feb 20, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास विठोबा फुले यांची माळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नगर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक अहमदनगर येथे पार पडली. त्यामध्ये नगर तालुक्यातील विविध पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये नगर तालुका अध्यक्षपदी रामदास फुले यांची, तर नेप्तीच्या समता परिषद शाखा अध्यक्षपदी शशिकांत होले, निमगाव फाटा शाखा अध्यक्षपदी हरिभाऊ पुंड यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, पश्‍चिम विभाग अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष प्रशांत शिंदे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव आदी उपस्थित होते.
रामदास फुले म्हणाले की, संघटना वाढीसाठी व माळी समाजाच्या विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहून काम करणार आहे. तीस वर्षाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन समता परिषदेने नगर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. या आधीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून, वरिष्ठांनी जो विश्‍वास दाखविला तो सार्थ ठरवून समाजाच्या सेवेसाठी तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेत काम करण्याची संधी मिळाली हे मोठे भाग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *