• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये 19 जून रोजी योग सोहळ्याचे आयोजन

ByMirror

Jun 8, 2022

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उपक्रम


नगरकरांना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवार दि.19 जून रोजी सुख योगा व स्वस्तिक नेत्रालय व मॅटर्निटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योग सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन नगरकरांना करण्यात आले आहे.


आज स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्यायामापासून दुरावत असून, ताण-तणावाखाली वावरत आहे. चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. जीवन निरोगी व शरीर सदृढ राहण्यासाठी नागरिकांमध्ये योग-प्राणायामाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये लोकप्रतिनिधी, पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी आवश्यक असून, या मोबाईल क्रमांकावर 9673331414, 9273331414, 9244108108, 8862027777 संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *