आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उपक्रम
नगरकरांना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.19) जून रोजी शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये सुख योगा व स्वस्तिक नेत्रालय व मॅटर्निटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर वाडियापार्क मैदानाची पहाणी करण्यात आली.
जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणार्या योग सोहळ्याचे दिमाखदार नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मैदानाची पहाणी करुन स्टेज उभारणी, साऊंड सिस्टिम आदी सुविधांबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी सागर पवार, डॉ. प्रफुल्ल चौधरी, नितेश हेडा, मोहसीन सय्यद, आशिष कुमार, अक्षय शर्मा, हेमंत रासने, दातीर पांडूरंग, श्रीराम दिवटे, माधुरी दांगट, कविता कुमावती, गायत्री गारडे आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्यायामापासून दुरावत असून, ताण-तणावाखाली वावरत आहे. चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. जीवन निरोगी व शरीर सदृढ राहण्यासाठी नागरिकांमध्ये योग-प्राणायामाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. नगरकरांना या योग सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी आवश्यक आहे. या मोबाईल क्रमांकावर 9673331414, 9273331414, 9244108108, 8862027777 संपर्क साधून नांव नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे.