तर समाजातील घटस्फोटीत, विधवा आणि विधूर पुरुष, महिलांसाठीही होणार परिचय मेळावा
समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने शहरात रविवारी (दि.7 ऑगस्ट) निशुल्क वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. न्यु टिळक रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सकाळी 12 वाजता हा वधु-वर मेळावा पार पडणार असून, याचा समाजबांधवांना लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष संजय कांबळे यांनी केले आहे.
या बौध्द वधु, वर परिचय मेळाव्यात अविवाहित मुला, मुलीसाठी योग्य स्थळ निवडण्याकरीता तसेच समाजातील घटस्फोटीत, विधवा आणि विधूर पुरुष, महिलांसाठी देखील योग्य पुनर्विवाहासाठी स्थळ पाहिले जाणार आहे. युवक-युवतींच्या परिचय मेळाव्यानंतर घटस्फोटीत, विधवा, विधूर यांचा परिचय मेळावा होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव सत्येंद्र तेलतुबडे यांनी दिली आहे.
या मेळाव्यासाठी येताना विवाह इच्छुकांचा एक पासपोर्ट व उभा फोटो बॉयडेटासह आणावे. वधु-वर मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कायदे सल्लागार अॅड. संतोष गायकवाड, मिलिंद आंग्रे, किशोर कांबळे, प्रकाश कांबळे, अण्णासाहेब गायकवाड, शिवाजी भोसले, आप्पा बनसोडे, दिपक अमृत, अशोक बागुल, विष्णु ठोंबे प्रयत्नशील आहेत. अधिक माहितीसाठी सत्येंद्र तेलतुंबडे 9860345591 व मिलिंद आंग्रे 9623701036 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
![](https://mirrornews24.in/wp-content/uploads/2022/08/Look-Fine-2-853x1024.jpeg)