• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

युवकांची प्रजासत्ताक दिनी स्वराज्य फाउंडेशनची स्थापना

ByMirror

Jan 27, 2023

बालभवनला महापुरुषांच्या जीवन चरित्रावर पुस्तकेभेट देऊन फाऊंडेशनचा लोकार्पण

समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व युवकांना संघटित होण्याची गरज -प्रकाश वाघमारे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सामाजिक कार्य करणार्‍या युवकांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वराज्य फाउंडेशनची स्थापना केली. रामवाडी येथे फाऊंडेशनच्या लोकार्पण सोहळा स्नेहालय संचालित परिस बालभवनला महापुरुषांच्या जीवन चरित्रावर पुस्तकेभेट देऊन करण्यात आला.


यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वाघमारे, भाजप मंडल अध्यक्ष अशोक भोसले, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सतीश साळवे, दीपक साबळे, दीपक सरोदे, राजू कांबळे, बालभावनातील सर्व शिक्षक मान्यवर व परिसरातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संस्थापक अध्यक्ष प्रकाश वाघमारे म्हणाले की, समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व युवकांना संघटित होण्याची गरज आहे. शहरात सर्वच राजकीय पक्ष युवकांचा तात्पुरता उपयोग करुन घेत आहे. मात्र त्यांचे प्रश्‍न आजही कायम आहे. अनेक युवक बेरोजगार असून, हाताला काम नसल्याने प्रश्‍न गंभीर होत चालले आहे. झोपडपट्टीमधील नागरिक नरकयातना सोसत आहे. प्रशासनावर दबाव निर्माण करुन सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी हे फाऊंडेशन कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील आरोग्य, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक प्रश्‍नावर कार्य सुरु राहणार आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून दुर्बल घटकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न व वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी फाऊंडेशन कटिबध्द आहे. विशेषत: दुर्लक्षीत असलेल्या शहरातील झोपडपट्टी मधील प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याचे यावेळी फाऊंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *