
कोरोनाचे सावट कमी झाल्याने महाशिवरात्रीचा भक्तांमध्ये उत्साह -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपुर येथे गुरुनानक देवजी सेवा ग्रुप (जी.एन.डी.) च्या वतीने महाशिवरात्री निमित्त भाविकांना खिचडी व सरबतचे वाटप करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचे पो.नि. ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळंकी, जनक आहुजा, संजय आहुजा, हरजितसिंह वधवा, राज गुलाटी, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, बारस्कर, योगीराज गाडे, अमोल गाडे, महेश मध्यान, बाबा कर्नल सिंग, सतीश गंभीर, अवतार गुर्ली, प्रदीप पंजाबी, राकेश गुप्ता, अनिश आहुजा, हितेश ओबेरॉय, मनोज मदान, बिट्टू मनोचा, राहुल बजाज, कैलाश नवलानी, हॅपी कुकरेजा, अॅड. काका तांदळे, किशोर कंत्रोड, करण आहुजा, विकी कंत्रोड, चरणजितसिंह गंभीर, गुरमीत कथुरिया, आकाश गुलाटी, पुरुषोत्तम बेट्टी, शरद बेरड, प्रमोद पंतम, रोहित बत्रा, किशन पंजवानी, कविता आहुजा, निकिता आहुजा, आंचल कंत्रोड, दिपक मेहतानी, सुनील मेहतानी आदी उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत जनक आहुजा यांनी केले. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे भाविकांना महाशिवरात्री साजरी करता आली नाही. कोरोनाचे सावट कमी झाले असल्याने भक्तांमध्ये उत्साह असून, सर्व ठिकाणी मोठ्या भक्तीभावाने महाशिवरात्री साजरी करण्यात आली आहे. सण-उत्सवात भाविक एकत्र येऊन सामाजिक कार्यांना हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तर गुरुनानक देवजी सेवा ग्रुपने कोरोना काळात केलेले अन्नदान व इतर सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.