• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

समर्थ प्रशालेचा गिनीजसह पाच जागतिक विश्‍वविक्रमात सहभाग

ByMirror

May 7, 2026
सांस्कृतिक क्षेत्रात प्रशालेची घौडदौड कौतुकास्पद -दीपक ओहोळ

सांस्कृतिक क्षेत्रात प्रशालेची घौडदौड कौतुकास्पद -दीपक ओहोळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला,माध्यमिक विभागाने शैक्षणिक वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या गिनिजसह पाच विश्‍वविक्रमी उपक्रमात सहभाग घेतला. महाराष्ट्रदिनी मान्यवरांच्या हस्ते या विविध उपक्रमांच्या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ, सचिव सुरेश क्षीरसागर, प्राचार्या वसुधा जोशी, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रयोगशाळा परिचर मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. वर्षभरातील या उपक्रमांचे समन्वयक म्हणून दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी काम पाहिले.
संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व शालेय समिती चेअरमन ॲड.किशोर देशपांडे यांचे मार्गदर्शन या उपक्रमांना लाभले. यामध्ये 1) शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित “परीक्षा पे चर्चा”2024-25 मध्ये प्रशालेचा सहभाग, 2)महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था “अमृत”च्या वतीने दीपावलीनिमित्त दूर्ग बनवा उपक्रम, 3)भारत सरकारच्या प्रौद्योगिकी व इलेक्ट्रॉनिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय इंडिया-AI समीटमध्ये AI प्रश्‍नमंजुषा व शपथ उपक्रम, 4)शिक्षण मंत्रालय,भारत सरकारच्या वतीने नॅशनल बुक ट्रस्ट – इंडियाच्या वतीने आयोजित “शांतता पुणेकर वाचत आहेत-बुक सेल्फी” उपक्रम- वरील चारही संकल्पनांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश व 5)महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने 26 जानेवारी- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित “राष्ट्रप्रथम” या देशभक्तीपर गीतांवरील नृत्य कवायत उपक्रम – वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस. या पाच विश्‍वविक्रमी उपक्रमात सहभाग आहे.


“संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न केले जातात. अभ्यासाबरोबरच इतर विविध आवडत्या क्षेत्रात संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला हातभार लागतो. गिनीजसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रशालेचे नाव झळकते आहे, ही अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे .”असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ यांनी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *