शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेनचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शुक्रवार (दि.4 मार्च) पासून सुरु झालेल्या एचएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील अशोकभाऊ फिरोदियाइग्लिश मेडीयम स्कूल व रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूल येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना ऑल दी बेस्ट म्हणत गुलाबपुष्प व पेनचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या ऑनलाईन शिक्षणानंतर ऑफलाईन पध्दतीने विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असताना त्यांच्या मनातील दडपण दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी एक आत्मविश्वास देण्यात आला.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अशोकभाऊ फिरोदिया स्कूलचे प्राचार्य प्रभाकर भाबड, रुपीबाई बोराचे प्राचार्य संजय पडोळे, उपप्राचार्य सुवर्णा वैद्य, पर्यवेक्षक संतोष मुथा, सोमनाथ नजान, अनिल काळे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अमित खामकर, सरचिटणीस गणेश बोरुडे, उपाध्यक्ष निलेश इंगळे, नगर तालुका उपाध्यक्ष लहू कराळे आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आजचा काळ स्पर्धेचा असून, या स्पर्धेत टिकण्यासाठी परीक्षा काळात विद्यार्थ्यांपुढे मोठे दडपण तयार होते. मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑफलाईन सुरु होते. यामुळे विद्यार्थी मोठ्या तणावाखाली परीक्षेला सामोरे जात असून, त्यांना शुभेच्छा देऊन एकप्रकारे धीर देण्याचे काम करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा आनंदाच्या वातावरणात देता यावे व त्यांच्या मनातील भिती नाहीशी होण्यासाठी दरवर्षी राष्ट्रवादी हा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. तर मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन झाले असल्याने त्यांना लेखणाची जास्त सवय राहिलेली नाही, या पार्श्वभूमीवर शासनाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या वाढीव अर्धा तास निर्णयाचे स्वागत करुन आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या पहिल्या पेपरसह इतर सर्व पेपर चांगले जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने सदिच्छा व्यक्त करण्यात आली.