• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

बनावट एनओसी प्रकरणातील आरोपी राजा ठाकूरला जामीन

ByMirror

Nov 20, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार मधील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या बनावट एनओसी प्रकरणातील आरोपी राजा ठाकूर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.


सैन्य दलातील स्टेशन हेडकॉर्टर अंतर्गत बांधकामासाठी आवश्यक एनओसीचे काही बनावट कार्यालयीन पत्रव्यवहार सही शिक्यासह केल्याचे निदर्षणास आले व त्याबाबतचा गुन्हा नोंदविण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या सांगण्यावरुन कोतवाली पोलीस स्टेशनला राजेंद्र देसराज सिंग उर्फ राजा ठाकूर व इतर तीन यांच्या विरुद्ध भा.द.वि. कलम 420, 464, 465, 467, 468, 471 व 472 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी राजा ठाकूर व इतरांना अटक करुन अहमदनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले.


सदर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर येथे अ‍ॅड. महेश तवले, अ‍ॅड. संजय दुशिंग यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणात आरोपीच्या वकीलांनी युक्तीवाद करुन आरोपीची बाजू मांडली व न्यायालयास निदर्षणास आणुन दिले की, आरोपी राजा ठाकूर यांच्याकडून पोलीसांना कुठलाही पुरावा प्राप्त झाला नाही व गुन्ह्यात वापरलेले एन.ओ.सी., रबर स्टॅम्प याची देखील आरोपी यांच्याकडून जप्ती झालेली नाही, त्यामुळे गुन्ह्यात लागू केलेली कलमे ही आरोपी यांना लागू होत नाहीत, आरोपीचा गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही, केवळ संशयाने आरोपी यांना अटक केलेले आहे. गुन्हा हा कागदपत्रांशी संबंधीत असून आरोपी यांचे प्रत्यक्ष ताब्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.


सरकार पक्षातर्फे आरोपी यांचे वकीलांनी गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे व आरोपीचा गुन्ह्यात सहभाग आहे. आरोपीला गुन्ह्यातील सर्व हकीकत माहिती आहे अशी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी राजा ठाकूर यांना जामीन दिले. आरोपीतर्फे अ‍ॅड. महेश तवले, अ‍ॅड. संजय दुशिंग यांनी काम पाहिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *