• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

पिंपळगाव वाघाचे प्रगतशील शेतकरी मारुती वाबळे यांचे निधन

ByMirror

May 10, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील प्रगतशील शेतकरी मारुती बाबुराव वाबळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. जखणगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाबळे व उद्योजक दत्ता वाबळे यांचे ते वडिल होते.


धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ, बहिण, पुतणे, भाचा, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *