गावातील सप्ताहासाठी मुस्लिम बांधवाचा हातभार
मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव आर्वजून उपस्थित
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील मशिदमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करुन, गावाच्या सुख, समृध्दी व शांततेसाठी प्रार्थना केली. नमाजनंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव मशिदीबाहेर आर्वजून उपस्थित होते. एकमेकांना अलींगण देत ईदच्या शुभेच्छा तर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या. यातून गावातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.
उद्योजक दिलावर शेख यांनी गावात सुरु असलेल्या सप्ताहासाठी आर्थिक मदत हिंदू बांधवांकडे सुपुर्द केली. यावेळी चांद शेख, जावेद शेख, आदम शेख, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुस्ताक शेख, राजू शेख, दिलावर शेख, ह.भ.प. विठ्ठल महाराज फलके, यासीन शेख, मोहसीन शेख, सादिक शेख, गुड्डू शेख, अब्दुल शेख, गुलाब शेख, अन्सार शेख, नासीर शेख, पोलीस कॉन्स्टेबल समिर शेख, प्रमिला गायकवाड, संदिप डोंगरे आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील ग्रामस्थांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुर्माचा आस्वाद घेतला.