• Wed. Jan 22nd, 2025

निमगाव वाघात वृक्षरोपणाने पर्यावरण दिन साजरा

ByMirror

Jun 5, 2022

वृक्ष संवर्धनाचा ग्रामस्थांनी केला संकल्प


वृक्ष जगले तर सजीव सृष्टी वाचणार -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते रोप लाऊन वृक्षरोपण अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, सुनिल जाधव, इसहाक शेख, फिरोज खान, तय्यब शेख, जावेद शेख, अतुल फलके, छगन भगत, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, ज्ञानेश्‍वर जाधव, मन्सूर शेख, प्रतिभा डोंगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


गावातील मस्जिद व सार्वजनिक व्यायाम शाळेच्या परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. तर यावेळी लावलेली झाडे जगविण्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. साहेबराव बोडखे यांनी वृक्षरोपण व संवर्धनासाठी युवक युवतींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. देशातील युवाशक्तीच्या सहकार्यानेच पर्यावरणाचा प्रश्‍न मिटणार असून, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता असल्याचे सांगितले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरण हा जागतिक प्रश्‍न बनला असून, वृक्षरोपणाशिवाय पर्याय राहिला नाही. वृक्ष जगले तर सजीव सृष्टी वाचणार असल्याने, प्रत्येकाने वृक्षरोपण करणे काळाची गरज बनली आहे. काही क्षणिक सुखांसाठी पर्यावरणाचा र्हास होत आहे. आपल्या पुढील वंशाचे असतित्व वृक्षरोपण व संवर्धनावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. स्वखर्चाने झाडे लाऊन त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. गावात मोठ्या संख्येने झाडे लावली असून, लग्न समारंभ व इतर सण-उत्सव काळात वृक्षरोपण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *