• Thu. Jan 16th, 2025

दरेवाडीच्या प्रताप भोगाडे चे मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत यश

ByMirror

Apr 27, 2022

दरेवाडी ग्रामस्थ व प्रताप हेल्थ क्लबच्या वतीने सत्कार


अहमदनगर(प्रतिनिधी)- दरेवाडीचे सुपुत्र प्रताप भोगाडे यांनी आयबीबीएफ आयोजित मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत यश संपादन करुन पाचवा क्रमांक पटकावला. पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे झालेल्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत भोगाडे यांनी सदरची कामगिरी केली. यामध्ये देशभरातील शरीर सौष्ठवपटू सहभागी झाले होते.


या यशाबद्दल दरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भोगाडे तसेच सद्दाम शेख याने ज्युनियर भारत श्री मिळवल्याबद्दल त्यांचे व प्रशिक्षक सोहेल शेख यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, दरेवाडीचे सरपंच सुभाष बेरड, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेरड, बद्रिकाका बेरड, नरेश बेरड, बळीराम बेरड, सुनील बेरड, मच्छिंद्र बेरड, सचिन बेरड, विशाल ससे, दीपक बेरड, प्रा.अशोक बेरड, विक्रम भोगाडे, प्रशिक्षक सोहेल शेख आदी उपस्थित होते.


हरिभाऊ कर्डिले म्हणाले की, भोगाडे यांनी केलेली कामगिरी गावासाठी तसेच संपूर्ण नगर तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवण्याची कामगिरी त्याने केली होती. भविष्यातही ते आणखी उत्तुंग भरारी घेतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भोगाडे हा प्रताप हेल्थ क्लबमध्ये व्यायाम करीत असून, युवकांना देखील त्याचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *