• Wed. Jan 22nd, 2025

जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमचा भंडारा

ByMirror

Aug 7, 2022

सर्व धर्मिय युवकांचा सहभाग

भाविकांसह गरजू घटकांना अन्नदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरमनिमित्त जुना बजार यंग पार्टीच्या वतीने सालाबादप्रमाणे सर्व धर्मियांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोहरम साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली होती. यावर्षी सर्व भाविकांना पंगतीमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.


शहरातील ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान यांच्या हस्ते भंडार्‍याची सुरुवात करण्यात आली. यावेळी यंग पार्टीचे अध्यक्ष इरफान बेग, शाहनवाज सय्यद, सरफराज सय्यद, ऋषिकेश कावरे, फैज भाई, मुन्नावर शेख, शाहिद वस्ताद, रफिक बागवान, राजू सय्यद, सुलतान सय्यद, नवेद शेख, शरीफ सय्यद, हंजला शेख, कुद्दूस शेख, आफताब शेख, मुआज खान, मतीन शेख, राम परदेशी, भिमराव, सैफ सय्यद, जुबेर शेख, अदनान शेख, अकिल बागवान, आयन बागवान, नबील बागवान, कैफ सय्यद, हमजा सय्यद, सादिक खान, अझर शेख, उमान सय्यद, आयान शेख, रेहान बागवान आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इरफान बेग म्हणाले की, जुना बजार यंग पार्टी दरवर्षी मोहरमनिमित्त सामाजिक उपक्रम राबवित असते. मागील दोन वर्ष कोरोना काळात गरजूंना घरोघरी भंडार्‍याचे वाटप करण्यात आले होते. या वर्षी देखील सर्व धर्मिय भाविकांसाठी अन्नदानचा उपक्रम घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. ऋषिकेश कावरे यांनी धार्मिक एकता, सौहार्द व राष्ट्रीय एकात्मतेसाठी शहराची मोहरम प्रसिध्द असून, सर्व मोहरमच्या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे सांगितले.
शाहनवाज सय्यद म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपत जुना बजार यंग पार्टीचे युवक विविध उपक्रम राबवित असतात. या वर्षी भाविकांसह गरजू घटकांना देखील अन्नदान करुन त्यांना एकप्रकारे आधार देण्याचे काम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *