• Fri. Mar 21st, 2025

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पै. नाना डोंगरे यांचा जातीय सलोखा व धार्मिक ऐक्यासाठी विविध उपक्रम राबविल्याबद्दल गौरव

ByMirror

Apr 30, 2022

अहमदनगर(प्रतिनिधी)- ग्रामीण भागात जातीय सलोखा व धार्मिक ऐक्यासाठी विविध उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


तेलीखुंट येथील रोजा इफ्तार कार्यक्रमात मजलीस ए हुसैन कमिटीच्या वतीने डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे पो.नि. संपत शिंदे, तोफखाना पोलीस स्टेशनच्या पो.नि. ज्योती गडकरी, शफी जहागीरदार, राजू जहागीरदार, अजर खान, मिरा बिल्डरचे इरफान जहागीरदार आदी उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे यांनी निमगाव वाघा येथे गणेशोत्सव, मोहरम, रमजान व दिवाळीमध्ये धार्मिक सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहे. गावात सण-उत्सव सर्वांना बरोबर घेऊन साजरे करण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. मोहरम व गणेशोत्सवात स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ते सामाजिक व धार्मिक ऐक्यासाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित आहे. मंदिर-मस्जिद परिसरात वृक्षरोपण व स्वच्छता अभियान राबवून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास पुढाकार घेत असल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *