• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

जागतिक अंध दिनी 48 दृष्टीहीनांना मिळाली नवदृष्टी

ByMirror

Oct 15, 2022

फिनिक्स फाऊंडेशनच्या पुढाकाराने रुग्णांवर मोतीबिंदू व काचबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने जागतिक अंध दिनी 48 रुग्णांवर मोतीबिंदू व काचबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन त्यांना नवदृष्टी मिळाली. नुकतेच शस्त्रक्रिया होऊन ज्येष्ठ नागरिक शहरात परतले असता फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी त्यांचे स्वागत केले. या ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.


फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे नुकतेच नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिराद्वारे 48 ज्येष्ठ नागरिकांना के.के. आय बुधराणी पुणे येथे मोतीबिंदू व काचबिंदूच्या शस्त्रक्रियासाठी पाठविण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठ रुग्णांना नवदृष्टी मिळाली आहे.


आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीहीन रुग्णांना दृष्टी मिळण्यासाठी जिल्ह्यासह राज्यात फिनिक्स फाऊंडेशनने मोठी चळवळ उभी केली आहे. 28 वर्षापासून फाऊंडेशन या क्षेत्रात कार्यरत असून, दर महिन्याला गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले जाते. या शिबीराच्या माध्यमातून नेत्रदानाबाबत जनजागृती करुन संस्थेने 710 जणांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनले आहे. यामुळे 1340 अंधांना नवदृष्टी मिळाली आहे. तसेच फाऊंडेशनच्या वतीने 2 लाख 84 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना नवदृष्टी मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *