• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

चर्मकार विकास संघाने ना. शरद पवार यांच्यासमोर मांडले कष्टकरी व गटई कामगारांचे प्रश्‍न

ByMirror

Sep 16, 2022

जनसंघटनांना बळ देण्यासाठी केंद्र सुरु करण्याचे आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांच्या पुढाकाराने व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत सुमारे 68 जनसंघटना व संस्थांच्या प्रतिनिधींची ज्येष्ठ नेते खासदार ना. शरद पवार यांच्यासह बैठक पार पडली.


मार्केटयार्ड पुणे येथील राष्ट्रवादी ट्रेनिंग सेंटर येथे पार पडलेल्या या बैठकित चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी कष्टकरी गटई कामगारांचे प्रश्‍न मांडले. तसेच महिला सक्षमीकरण व दिव्यांग यांच्या विषयी भुमिका विशद केली. याप्रसंगी खा. पवार यांना संघाटनेच्या कार्याचा तीनशे पानांचा अहवाल व समाजाच्या प्रश्‍नांचे निवेदन देऊन संत गुरु रविदास महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. खा. पवार यांनी चर्मकार विकास संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष कानडे उपस्थित होते.


संविधानाचा प्रचार व संविधानाचे भान असलेला माणूस तयार करणे हे फार महत्त्वाचे कार्य असल्याचे खा. पवार यांनी सांगितले. यासाठी संविधान दिनी, 26 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जनसंघटनांना बळ देण्यासाठी केंद्र सुरु केले जाणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. तर आदिवासींचे, वंचितांचे प्रश्‍न व समस्या या संदर्भात एक स्वतंत्र केंद्र सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


या बैठकित महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली. महिला, बालहक्क, शिक्षण, आरोग्य अशा विविध सामाजिक विषयावर ज्या संस्था विधायक काम करत आहेत, त्या संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्‍न व अपेक्षा या बैठकीत मांडल्या. रचनात्मक आणि संघर्षात्मक काम करणार्‍या संस्था आणि जनसंघटनांना बळ देण्याचा प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *