• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या निशुल्क मोहटादेवी दर्शन यात्रेस महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

ByMirror

Oct 4, 2022

पहिल्या माळेपासून नऊव्या माळेपर्यंत मोहटादेवीच्या दर्शनाला बसद्वारे रवानगी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त महिला भाविकांना श्री क्षेत्र मोहटा (ता. पाथर्डी) येथील जगदंबा देवीचे दर्शन घडविण्यात येत आहे. टीव्ही सेंटर येथून प्रतिष्ठानच्या वतीने मोफत बस सेवा सुरु करुन, महिला भगिनींसाठी निशुल्क दर्शन यात्रेचा उपक्रम सुरु आहे.


प्रतिष्ठानचे संस्थापक योगेशभाऊ सोनवणे पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आत्तापर्यंत अनेक महिलांना नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून मोहटादेवी दर्शनासाठी दररोज रवानगी करण्यात येत आहे. यामध्ये भाविकांना फराळाचा नाष्टा, पाणी बॉटल, फळे आदींची सेवा देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरवली जात असल्याने भाविकांना चांगल्या पध्दतीने मोहटादेवीचे दर्शन घडत आहे.


या दर्शन यात्रेसाठी सावेडी उपनगर भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून, सर्व सोयीयुक्त अशी मोफत दर्शन यात्रा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार निलेश लंके यांच्या उपक्रमातून प्रेरित होऊन हा उपक्रम राबवला असल्याची माहिती योगेशभाऊ सोनवणे पाटील यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *