• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

रिपाईच्या युवक शहर जिल्हाध्यक्षपदी आवेझ काझी यांची नियुक्ती

ByMirror

Feb 11, 2023

युवकांचा रिपाईत प्रवेश

अदानी समुह देश लुटत असताना, सर्वसामान्यांना धर्मा-धर्मात लढविण्याचे काम -सुशांत म्हस्के

अहमदनगर (प्रतिनिधी)- अदानी समुह देश लुटत असताना, सर्वसामान्यांना धर्मा-धर्मात लढविण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. राज्यात जातीयवादी मोर्चांपेक्षा देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चे निघण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रिपाईचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात आवेझ काझी यांनी आपल्या मित्र परिवारासह प्रवेश केला. काझी यांचे पक्षात स्वागत करुन त्यांची युवक शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी म्हस्के बोलत होते.

पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाप्रसंगी शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख, ओबीसी शहरध्यक्ष विजय शिरसाठ, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, अझीम खान, हुसैन चौधरी, अभिजित, अरबाज शेख, जावेद शेख, एजाज कुरेशी, अजहर सय्यद, आरशान काझी, कामिल खान, अल्फेज ़कुरैशी, अदनान काझी, अरमान काझी, काईद खान, मोइज काझी, फैय्याज शेख, रेहान काझी, फैजान काझी, परवेज शेख, सिद्दीक काजी, आकाश वाघ, सुफीयान शेख, मयूर पारधे, सुफीयान कुरेशी, अमन शेख, तुषार फुंदे, मोहसीन कुरेशी आदी उपस्थित होते.


पुढे म्हस्के म्हणाले की, सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाऐवजी धार्मिक प्रश्‍न उपस्थित करुन नागरिकांचे विचार भरकटविण्याचे काम सुरु आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने रिपाई सर्व समाजाला बरोबर घेऊन कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.


शहर कार्याध्यक्ष दानिश शेख म्हणाले की, देशात अल्पसंख्यांक समाजावर हल्ले होत असून, त्यांच्यात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. लोकशाही विरोधी कृत्य करुन हुकुमशाहीपध्दतीने राज्यात व केंद्रात सरकार काम करत आहे. बहुजन समाजात फुट पाडून राजकीय सत्ता कायम राखण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी युवक शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल काझी व रिपाई मध्ये आलेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आवेझ काझी यांनी समाजातील युवकांचे प्रश्‍न गंभीर होत आहे. रोजगार व नोकरीचे प्रश्‍नांना बगल देण्यासाठी युवकांना धार्मिकतेच्या प्रश्‍नाकडे ढकळले जात आहे. मात्र रिपाईच्या माध्यमातून युवकांपर्यंत समाजाची वास्तवता मांडून युवकांच्या प्रश्‍नावर आवाज उठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *