• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

महिलांच्या स्वयंरोजगारासाठी वैष्णवी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन

ByMirror

Dec 9, 2022

महिलांना दिले जाणार विविध व्यावसायिक प्रशिक्षण

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या वैष्णवी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या निंबळक (ता. नगर) येथील संपर्क कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयात फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती वाघ यांनी दिली.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक विटेकर, सचिव संदीप (नाना) कापडे, खजिनदार दीपक कांबळे, सदस्य सुहास गायकवाड, ओंकार वाघ, मीराबाई विटेकर, उमंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे आदी उपस्थित होते.


संदीप (नाना) कापडे म्हणाले की, महिला विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आर्थिक संपन्न झाल्यास समाजाचा देखील विकास साधला जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचा वैष्णवी मल्टीपर्पज फाउंडेशनचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.


अध्यक्षा ज्योती वाघ म्हणाल्या की, महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध व्यावसायिक प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. बेसिक व ऍडव्हान्स कोर्सचा महिलांना लाभ घेता येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिला युवतींना स्वत:चा व्यवसाय सुरु करुन चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *