• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार व मटक्यांवर कारवाई करण्याची मागणी

ByMirror

Dec 8, 2022

भीम पँथरचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

सर्वसामान्यांचे संसार उध्वस्त होऊन, युवा वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार व मटक्यामुळे सर्वसामान्यांचे संसार उध्वस्त होऊन, अवैध दारु, गांजा व अमली पदार्थाच्या सेवनाने युवा वर्ग व्यसनाच्या आहारी जात असताना सर्व अवैधधंदे व जुगार बंद करण्याची मागणी भीम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जिल्ह्यातील हा ज्वलंत प्रश्‍न मांडला. यावेळी भीम पँथरचे प्रदेश महासचिव राज खान, उत्तर जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष मतीन शेख, हाजी बिलाल कुरेशी, एजाज शेख आदी उपस्थित होते.


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले असून, राजरोसपणे सुरू आहे. अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत चालले आहे. या जुगारसाठी पुरुष मंडळी काम न करता सर्वकाही गहाण ठेऊन डाव लावत आहे. तर युवक देखील व्यसनाच्या आहारी जात आहे. कुटुंबातील अनेक मुला-मुलींचे शिक्षण धोक्यात आले आहे. तर महिलांचा संसार उघड्यावर आला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


संपूर्ण जिल्ह्यासह प्रामुख्याने नेवासा, संगमनेर, श्रीरामपूर तालुक्यात अवैधंद्यांचा सुलसुलाट वाढला आहे. अवैध धंद्यामुळे गुंडगिरीचे प्रमाण देखील वाढले असून, सर्वसामान्य माणसाला यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदे दिवसाढवळ्या सुरु असल्याचा आरोप भीम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. त्वरीत पोलीस दलाने या प्रश्‍नावर गांभीर्याने विचार करुन जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे, अवैध दारु व गांजा विक्री बंद होण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *