छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबिर राबविण्यात आले. या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करुन संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व आरतीने रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच किरण जाधव, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, सोसायटीचे संचालक तथा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, पै. अनिल डोंगरे, प्रतिष्ठानचे प्रमुख भाऊसाहेब उर्फ पिंटू जाधव, पीएसआय छगन कापसे, वैभव पवार, डॉ. विजय जाधव, भरत बोडखे, डॉ. विलास मढीकर, गणेश कापसे, अजय ठाणगे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासनिमित्त युवकांना संघटित करुन संभाजी महाराजांचे पराक्रम, स्वराज्यासाठी दिलेले बलिदान यासंदर्भात जागृती सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर राबविण्यात आले होते. यामध्ये संपत नाट, अमोल कापसे, संदीप उधार, अनिकेत जाधव, रितेश डोंगरे, नवनाथ हारदे, बापू जाधव, संदीप खळदकर, राज रेपाळे, दत्तात्रय जाधव, ज्ञानेश्वर बोडखे, सुशांत जाधव, सुयश जाधव, प्रशांत जाधव, रामदास जाधव, प्रतीक जाधव, विठ्ठल उरमुडे, गणेश जाधव, मुकुंद कापसे, विशाल गावडे, अमोल फडके, नानाभाऊ जाधव, ऋषिकेश बोडखे, अक्षय पवार, मनोज फलके आदींसह गावातील युवकांनी रक्तदान केले. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, संभाजी महाराजांचे कार्य व स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा इतिहास प्रेरणादायी आहे. युवकांना प्रेरणा मिळण्यासाठी महापुरुषांचा इतिहास ज्ञात असला पाहिजे. इतिहास घडविणारी माणसे इतिहासामधून प्रेरणा घेत असतात. युवकांनी रक्तदान शिबिरातून संभाजी महाराजांना केलेले अभिवादन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
अतुल फलके म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माणासाठी जीवन सर्मपण केले. तर संभाजी महाराजांनी धर्मासाठी मृत्यूला कवटाळले. हा धगधगता इतिहास आजच्या पिढीला ज्ञात होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाऊसाहेब उर्फ पिंटू जाधव यांनी शिवकालीन इतिहास हा आजच्या युवकांना प्रेरणा व स्फूर्ति देणार आहे. घराघरातून महाराजांच्या संस्काराने मुले घडविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रक्तदान शिबिरासाठी एकता फाऊंडेशन, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जन कल्याण रक्तपिढीचे डॉ. प्रसाद ईटकर, गयाबाई चव्हाण, मेघना शिंदे, किशोर यादव, चंद्रकला फंड, मनिषा जोशी यांनी परिश्रम घेतले. गावात संपूर्ण महिनाभर बलिदान मास निमित्त महाराजांना श्लोक वाचनातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.