• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

ByMirror

Mar 5, 2026
राज्यस्तरीय माळी वधू-वर मेळाव्यामध्ये होणार गौरव

राज्यस्तरीय माळी वधू-वर मेळाव्यामध्ये होणार गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. शहराच्या टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रविवार 22 मार्च रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय माळी वधू-वर मेळाव्यामध्ये समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन मुख्य आयोजक ॲड. पोपटराव बनकर, ॲड. महेश शिंदे, गणेश बनकर, स्वाती डोमकावळे यांनी केले आहे.


रयत प्रतिष्ठान, जय युवा अकॅडमी, जनवार्ता, क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्था, समृद्धी बहुउद्देशीय महिला संस्था, सावित्रीबाई फुले महिला संस्था, श्री संत सावता माळी युवक संघ तसेच जागृती बहुउद्देशीय संस्था आदींच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय माळी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्ती, शासकीय कर्मचारी-अधिकारी, सामाजिक संस्था, साहित्य क्षेत्र, महिलांच्या क्षेत्रात, आदर्श ग्रामपंचायत, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण, कला, क्रीडा क्षेत्र, उद्योग, व्यवसाय आणि सांस्कृतिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये निस्वार्थपणे सेवा करणाऱ्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र पुरस्काराचा स्वरुप असणार आहे.


या कार्यक्रमासाठी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, प्रा. सिताराम जाधव, शरदभाऊ झोडगे, महेश झोडगे, अंबादास गारुडकर, नितीन डागवाले, मंगल भुजबळ, प्रा. अश्‍विनी विधाते, सुवर्णाताई जाधव, जयश्री शिंदे, शेखर होले, स्वाती बनकर आदी परिश्रम घेत आहेत.


इच्छुक व्यक्तींनी आपले प्रस्ताव 15 मार्चपर्यंत जनवार्ता जीवनसाथी द्वारा ॲड. महेश शिंदे, पावन गणपती मंदिरा शेजारी, जुन्या कोर्टा मागे, टांगे गल्ली, नालेगाव अहिल्यानगर 414001 या पत्त्यावर पाठवावेत. उशिरा येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9004722330 व 9921810096 या क्रमांकावर संपर्क साधावा.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *