व्यसनमुक्तीवर जागृती करुन महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन
उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन, समाजातील दुर्बल घटकांना आरोग्य आरोग्य सेवा पुरविणाऱ्या उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवनागापूर येथे मोफत आरोग्य शिबिर, स्त्री रोग तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच व्यसनमुक्ती व महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना कार्य गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सिनेअभिनेते राजेश मन्चरे यांनी महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला. विविध स्पर्धेने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला होता. सर्व महिलांनी या कार्यक्रमात एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर केला.
महापुरुषाना अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरोही संगीत विद्यालयाचे स्वप्नील खराडे व प्रा.आदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेचे संतोष लांडे, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजी कपाळे, व्हेरासिटी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती सोनिग्रा, फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, महिला व बाल अपराध प्रतिबंधक शाखेच्या महिला पोलीस दीपा आठवले, उद्योजक किरण दाभाडे, सिंडिकेट बँक अधिकारी महादेव ढोबळे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट उपस्थित होते.
अनिल साळवे म्हणाले की, उमेद सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागासह शहरातील उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकांना आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आधार दिला जात असल्याचे स्पष्ट केले. कुणाल तनपुरे यांनी फाऊंडेशनच्या भविष्यातील विविध सामाजिक प्रकल्पाची माहिती दिली.
शिवाजी कपाळे यांनी उमेदच्या सामाजिक कार्याने उपेक्षितांना जीवन जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे. दुर्बल घटकांना आधार देण्याचे संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दिलीप पवार म्हणाले की, सामाजिक जाणीव ठेऊन उमेद फाऊंडेशनचे कार्य सुरु आहे. वंचितांचे आश्रू पुसण्याबरोबर त्यांच्या वेदना दूर करण्यासाठी सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्योती सोनिग्रा यांनी पुढील काळात उमेद बरोबर काम करून गरजू मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दीपा आठवले यांनी महिलाची सुरक्षा व कायदा या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उमेद सोशल फाऊंडेशनच्या राहुरी फॅक्टरी शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शाखा प्रमुख कुणाल तनपुरे, कार्यकरी अधिकारी राजेश मंचरे, प्रमुख सल्लागार रणजित लहारे, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे, संघटक श्रीकांत राऊत यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य सागर सप्रे, आप्पासाहेब सप्रे, आर्ट ऑफ लिविंगच्या भारती कोळसे, युगन्धर फाऊंडेशनच्या विद्या करपे, दिव्यांकुर फाऊंडेशनचे (पुणे) अध्यक्ष लक्ष्मण म्हस्के, वेलनेस कोच कविता खर्डे, रिपाईच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, आपचे जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, जिल्हा रुग्णालय नेत्र विभागचे सतीश आहिरे, शब्दगंधचे सुनील गोसावी, राम शिंदे, प्रिया डोळस, मनीषा कदम, शीतल खराडे, श्रुती चव्हाण, अर्जुन वायभासे, राधा साळवी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन उमेद फाऊंडेशनचे सचिव सचिन साळवी, सल्लागार ॲड. दीपक धिवर, सदस्य विजय लोंढे, रवी सुरेकर, रवी साखरे, योगेश घोलप, प्रकाश भालेराव, अक्षय गाडेकर, शुभांगी सोनवणे, मनीषा साळवे, वैशाली तनपुरे, रेशमा तनपुरे, डॉ. सतीश गिऱ्हे, अश्विनी वाघ यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी नवनागापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिध्द सोलनकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, रमेश गाडगे, जय असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.