• Fri. Jul 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

आनंद योग केंद्रात जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा

ByMirror

Feb 17, 2024

दोनशेपेक्षा जास्त योग साधकांचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी सूर्य नमस्कार घालण्यास सुरुवात केली. या उपक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


आरोग्य निरोगी व सदृढ राहून जीवन आनंदी होण्यासाठी आनंद योग केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना निशुल्क योग, प्राणायामाचे धडे दिले जातात. सर्वसामान्य नागरिकांमध्ये योग व प्राणायामाची आवड निर्माण होण्याच्या हेतूने जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला.

जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमात दोनशेपेक्षा जास्त योग साधकांनी सहभाग नोंदविला. उपस्थितांना निरोगी आरोग्यासाठी सुर्यनमस्काराचे फायदे सांगण्यात आले. सकाळी 10 वाजे पर्यंत योग साधकांचे सूर्य नमस्कार सुरु होते. आप आपल्या क्षमतेप्रमाणे साधकांनी 51, 101, 151 सूर्य नमस्कार पूर्ण केले. या उपक्रमासाठी योग केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *