• Fri. Jul 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

महिलांनी एकत्र येऊन लुटला कोजागिरी पौर्णिमेचा आनंद

ByMirror

Oct 17, 2024
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शिवशक्ती व कर्तृत्वाचा संगम -डॉ. वृषाली कवळे

स्पर्धेत स्पर्धेत सहभाग नोंदवून महिलांनी पटकाविले पैठणी साडीचे बक्षीस

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शिवशक्ती व कर्तृत्वाचा संगम -डॉ. वृषाली कवळे

नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी कोजागिरी पौर्णिमेचा आनंद लुटून विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
ग्रुपच्या 31 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्‍वभूमीवर हा सोहळा रंगला होता. यावेळी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, डॉ. वृषाली कवळे, मीनल खेडकर, सावेडी ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, उपाध्यक्षा अनिता काळे, उषा सोनी, सचिव हिरा शहापुरे, रेखा फिरोदिया, जयश्री पुरोहित, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सल्लागार विद्या बडवे, सविता गांधी, मेघना मुनोत, वंदना गारुडकर, राखी जाधव, नीलिमा पवार, ज्योती गांधी, उषा सोनटक्के, प्रतिभा भिसे, सोहनी पुरनाळे, सुजाता पुजारी, अर्चना बोरुडे, उज्वला धस, आरती थोरात, ज्योत्स्ना कुलकर्णी, शशिकला झरेकर, शकुंतला जाधव, आशा गायकवाड, साधना भळगट, ममता दाणी आदी उपस्थित होत्या.


डॉ. वृषाली कवळे म्हणाल्या की, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शिवशक्ती व कर्तृत्वाचा संगम आहे. महिलांनी आपल्या मधील क्षमता, कला-गुण ओळखून ते वृध्दींगत करुन स्वत:चे कर्तृत्व सिध्द करावे. सण-उत्सवात महिलांनी एकत्र येऊन आनंद घेतल्यास विचारांची देवाण-घेवाण होत असते. महिला सर्व कुटुंबीयांना आनंद देत असताना, स्वत:साठी वेळ देऊन जीवनाचा आनंद घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


प्रास्ताविकात विद्याताई बडवे यांनी ग्रुपच्या माध्यमातून मागील 30 वर्षापासून सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दीपा मालू यांनी महिलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या. विजेत्या महिलांना डॉ. वृषाली कवळे यांच्या वतीने पैठणी साडीचे बक्षीसं देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली दाऊतकर व सारिका कासट यांनी केले. आभार अनिता काळे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *