• Wed. Jun 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

वेदांत वैभव देशमाने याचे ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षेत यश!

ByMirror

Jun 3, 2026
संपूर्ण देशातून मिळवला 626 वा रँक

संपूर्ण देशातून मिळवला 626 वा रँक

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि कठीण मानल्या जाणाऱ्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड 2026’ (JEE Advanced 2026) या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. यामध्ये वेदांत वैभव देशमाने (Vedant Vaibhav Deshmane) या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने संपूर्ण देशात 626 वा ऑल इंडिया रँक (AIR 626) पटकावून आपल्या कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


या उत्कृष्ट रँकमुळे देशातील आघाडीच्या नामांकित आयआयटी (IIT) कॉलेजमध्ये त्याची निवड निश्‍चित झाली आहे. वेदांतने हे उज्वल यश आजोबा कै. सुहास अनंत देशपांडे यांना खऱ्या अर्थाने एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून समर्पित आहे. अत्यंत चिकाटी, नियमित अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर हे यश मिळवल्याचे त्याने सांगितले. वेदांतने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, कौटुंबिक मित्र व नातेवाईकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *