25 वर्षांची यशस्वी वाटचाल, टोयोटा कंपनीच्या वरिष्ठांनी केला सन्मान
नगर (प्रतिनिधी)- टोयोटा कंपनी भारतात येऊन आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या यशस्वी प्रवासात वासन टोयोटा ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुंबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विशेष कॉन्फरन्समध्ये टोयोटा कंपनीचे ग्रुप हेड अरुण सिमंथ व राज्याचे प्रमुख प्रशांत सर यांनी वासन टोयोटा चे चेअरमन विजय वासन आणि मॅनेजिंग डायरेक्टर तरुण वासन यांचा सन्मान केला. वेस्ट झोनमधील सर्वात अग्रगण्य सेल्स डीलरशिप म्हणून कामगिरी केल्याबद्दल वासन ग्रुपचा सन्मान करण्यात आला.
वासन टोयोटा डीलरशिप मुंबई, नासिक, पनवेल आणि अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत आहे, जे ग्राहकांना सेल्स व सर्विस सुविधांचा उत्कृष्ट अनुभव प्रदान करण्यासाठी सदैव तत्पर आहेत. यावेळी नाशिकचे सीईओ तेजी बेदी हे देखील उपस्थित होते. कंपनीच्या प्रमुखांनी वासन टोयोटाला आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
विजय वासन यांनी सत्कार स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, वासन टोयोटा ने 2024 मध्ये वेस्ट झोनमधील सर्वात अग्रगण्य सेल्स डीलरशिप म्हणून आपले स्थान प्रस्थापित केले आहे. त्यांनी या यशाचे श्रेय मुंबई, नाशिक, अहिल्यानगर येथील सर्व वासन टोयोटा ग्राहकांना दिले आणि त्यांच्या विश्वास आणि पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले.