महिला सक्षमीकरणाच्या कार्याचे कौतुक
नगर (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित झालेल्या मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे पाटील यांचा प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने गौरव करण्यात आला.
सारसनगर येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या सभामंडपात पार्वती (काकी) जगताप व प्रतिभा भिसे यांच्या हस्ते काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गीता पर्वते, योगिता पर्वते, आरती भुतडा, सुरेखा भोसले, छाया राजपूत, प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा, ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, उषा सोनी, प्रतिभा भिसे, अनिता काळे, मिरा पोफलिया, सीमा बंग, पुष्पा मालू, आशा निंबाळकर आदींसह ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला सक्षमीकरण व महिलांचे संघटन करुन सुरु असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनिता काळे यांना कर्जत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पार्वती (काकी) जगताप व प्रतिभा भिसे यांनी अनिता काळे यांचे महिला व युवतींसाठी सुरु असलेल्या कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनिता काळे यांनी महिलांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होणार आहे. महिलांनी केलेल्या सन्मानाने आणखी चांगले कार्य करण्यास प्रेरणा मिळणार असल्याची भावना सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.