• Sat. Apr 25th, 2026

नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा शहर सहकारी बँकेत सत्कार

ByMirror

Apr 25, 2026

“महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान” व “समाजभूषण” पुरस्काराबद्दल गौरव


नेत्रतपासणी शिबिद्वारे बोरुडे यांनी हजारो गरजू रुग्णांना नवजीवन आणि नवदृष्टी दिली -प्रा. माणिक विधाते

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा ‘नेत्रदूत’ श्री जालिंदर बोरुडे यांना कोल्हापूर येथील सत्यशोधक प्रागतीक निर्मिती विचार मंचच्या वतीने “महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पुरस्कार” तसेच बौध्द संस्कार संघाच्या वतीने “समाजभूषण पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल शहर सहकारी बँकेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.


बँकेचे व्हाईस चेअरमन प्रा. माणिक विधाते आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश लेंखडे यांच्या हस्ते जालिंदर बोरुडे यांचा सत्कार करण्यात आला. आले. उद्योजक वैभव बोरुडे, मखरे, विवेक गायकवाड, आनंद मोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना प्रा. माणिक विधाते यांनी जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तब्बल 34 वर्षांपासून सातत्याने नेत्रसेवा कार्य सुरू ठेवले आहे. ग्रामीण व शहरी भागात विविध नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करून हजारो गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. या कार्यामुळे अनेकांना नवजीवन आणि नवदृष्टी मिळाली आहे.


तसेच मरणोत्तर नेत्रदानाबाबत जनजागृती करून समाजामध्ये नेत्रदानाची चळवळ बळकट करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. अनेक नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करत समाजहिताचे कार्य पुढे नेले असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *