• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती साजरी

ByMirror

Feb 7, 2026
एकता फाऊंडेशनच्या वतीने अभिवादन

एकता फाऊंडेशनच्या वतीने अभिवादन


बाबासाहेबांच्या संघर्षामागे रमाबाईंची खंबीर साथ अविस्मरणीय -अतुल फलके

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात मोलाची साथ देणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.


या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन तसेच एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम केदार, सोसायटीचे संचालक अजय ठाणगे, बाबा गायकवाड, अनिल कैतके, मोसिन शेख, विवेक गायकवाड, बबलू गायकवाड, मुस्ताक शेख, सचिन गायकवाड,विजय गायकवाड यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अतुल फलके म्हणाले की, “रमाबाई आंबेडकर या खऱ्या अर्थाने त्यागमूर्ती आणि खंबीर स्त्री होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कधीही हार मानली नाही.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, विचार आणि सामाजिक चळवळीच्या पाठीशी उभे राहत त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. बाबासाहेबांचा इतिहास लिहायचा असेल, तर रमाबाईंचे पान न लिहिता तो इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. बाबासाहेबांना दिलेली रमाबाईंची साथ, त्यांनी सोसलेले हाल, कष्ट आणि त्याग आजच्या पिढीने समजून घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.”


यावेळी संग्राम केदार यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर सविस्तर माहिती देताना त्यांच्या संघर्षमय आयुष्याचा आढावा घेतला. रमाबाई यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत बाबासाहेबांच्या कार्यासाठी केलेला त्याग, समाजासाठी झेललेली उपेक्षा आणि त्यांचे अपार धैर्य याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रमाबाईंचे जीवन हे केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी रमाबाई आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. सामाजिक समता, शिक्षण आणि स्त्री सशक्तीकरणासाठी रमाबाईंच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *