हरदिन मॉर्निंग ग्रुप व भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम
आमदार जगताप पायाभूत सुविधांवर भर न देऊन सामाजिक प्रश्नही संवेदनशीलतेने सोडवत आहे -प्रा. माणिक विधाते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुप आणि भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. तसेच शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर बालभवनमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय रोकडेश्वर हनुमान मंदिर परिसरात निराधार ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजनचे वाटप करण्यात आले. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, समाजसेविका किरणताई संपत बारस्कर आणि माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मन्नूशेठ झंवर, सतीश ढवण, गजेंद्र भांडवलकर, योगेश एरंडे, प्रांजली सपकाळ, गायत्री मुंढे, जयश्री पोटे, ह.भ.प. पूजाताई अळकुटे-माने, माधवी माळगे, संगीताताई सपकाळ, गुलनाज शेख, लक्ष्मीताई पारधे, सुरेखाताई आमले, संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, ईवान सपकाळ, शिवम भंडारी, ताराचंद ठोकळ, अशोक पराते, दिलीप ठोकळ, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजी रिंगारदिवे, विलास तोडमल, सतीश सपकाळ, अभिजीत सपकाळ, शशांक अंबावडे, अर्जुन बेरड, अशोक लोंढे, विलास आहेर, रतन मेहेत्रे, छोटू जाधव, दिनेश लंगोटे, दीपक धाडगे, मनोहरराव दरवडे, सुधीर कपाळे, दीपक घोडके, शशिकांत बोरुडे, भगवान दळवी, काशिनाथ साळुंखे, योगेश करांडे, राजेंद्र माळगे, प्रशांत भिंगारदिवे, अविनाश जाधव, राजू कांबळे, गोकुळ भांगे, दीपक लिपाणे, मंगेश मोकळ, यश भिंगारदिवे, संपत बेरड, मच्छिंद्र भिंगारदिवे, जनाभाऊ भिंगारदिवे, विशाल भामरे यांच्यासह स्नेहालय संचलित ऊर्जा बाल भवनचे
गुलनाज सय्यद, सुप्रिया सदलापूरकर, रीमशा शेख, अंजुम शेख, आरती सदलापूरकर आदी उपस्थित होते.
वृक्षारोपणानंतर बालभवनमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंदाचे भाव दिसून आले. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात मिळाली. त्यानंतर रोकडेश्वर हनुमान मंदिर परिसरात निराधार आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
संजय सपकाळ म्हणाले की, “हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून मागील 26 वर्षांपासून योग, प्राणायाम, आरोग्य जनजागृती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. वृक्षारोपण करून थांबणे हा आमचा हेतू नसून त्या वृक्षांचे संवर्धन करणे हे आमचे ध्येय आहे. आजपर्यंत हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे. समाजातील गरजू घटकांना मदत, मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देत सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. शहर विकासाबरोबरच भिंगार उपनगराच्या विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सुमारे 10 कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांना चालना मिळाली. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये योग भवन उभारून नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला. भिंगारच्या विकासासाठी त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांनी विकासकामांसोबतच समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य केले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केवळ पायाभूत सुविधांवर भर न देता सामाजिक प्रश्नांकडेही संवेदनशीलतेने पाहिले. राजकारणातून समाजकारणाची वाट चालत जनसेवेचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे. अशा लोकप्रतिनिधींचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किरणताई बारस्कर म्हणाल्या की, “शहराचा सर्वांगीण विकास हा आमदार संग्राम जगताप यांचा ध्यास आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून विकासकामे मार्गी लावली. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यामुळेच नागरिकांचा त्यांच्यावर दृढ विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या.
सचिन चोपडा म्हणाले, “पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि संवर्धनाचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. या उपक्रमांना आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाबरोबरच नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात ह.भ.प. पूजाताई आळकुटे-माने यांना हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या ‘अहिल्याबाई होळकर कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

