• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

डोनेट फर्स्टच्या फनोरंजनाने वंचित, दुर्बल, निराधार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

ByMirror

Nov 18, 2024
डोनेट फर्स्टच्या फनोरंजनाने वंचित, दुर्बल, निराधार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

सांस्कृतिक कार्यक्रम व विविध मनोरंजनात्मक खेळात सहभागी होऊन केली धमाल

विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगी साहित्य व भेट

नगर (प्रतिनिधी)- महिलांचे संघटन करुन गरजू घटकातील परिवारांना आधार देणाऱ्या डोनेट फर्स्टच्या महिलांनी वंचित, दुर्बल, निराधार विद्यार्थ्यांसाठी फनोरंजनाचा आगळा-वेगळा उपक्रम राबविला. बडीसाजन मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात बालगोपालांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करुन विविध मनोरंजनात्मक खेळातून धमाल केली.


शहरातील बडी साजन मंगल कार्यालयात झालेल्या या फनोरंजन उपक्रमात बाल भवन आणि तपोवन बालप्रकल्प येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रहांचा प्रभाव या कार्यक्रमात बालकांना समजवून सांगण्यात आले. यावेळी विविध खाद्य पदार्थ व मनोरंजनात्मक खेळाचे स्टॉल लावण्यात आले होते. महिलांनी थाटलेल्या विविध खाद्य पदार्थांच्या स्टॉलला विद्यार्थ्यांनी भेट देऊन खाद्यांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे प्रारंभ नवकार मंत्र, गणेश वंदनेने करण्यात आले. यावेळी रंगलेला जादूगार शो, हास्य विनोद शो, रिंग डान्स, टैलेंट शो, एक मिनट गेम, लकी ड्रॉ व विविध खेळाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डोनेट फर्स्टने वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. विविध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तूंचे बक्षीस देण्यात आले.


या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना ग्रुपच्या माध्यमातून दैनंदिन उपयोगी साहित्याचे किट व बैग भेट देण्यात आली. महावीर ग्रुपच्या वतीने देखील बालकांना भेट वस्तू दिल्या. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमानंतर फनोरंजनाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला करण्यात आला होता. या उपक्रमाला अबालवृध्दांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


समाजातील गरजूंना मदत देण्यासाठी पाच मैत्रीणींपासून सुरु झालेल्या ग्रुपचे शहरातील मोठ्या संख्येने महिला सदस्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपून ग्रुपच्या महिला योगदान देत आहे. वंचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास बडी साजन ओसवाल श्रीसंघ, मुनोत नेवासकर ग्रुप, बडीसाजन युवक संघ, जैन ओसवाल युवक संघ, जीतो संघ, जैन ओसवाल क्रेडिट ग्रुप, जय आनंद ग्रुप, दिगंबर संघ, मंदिर संघ, महावीर ग्रुपचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *